रत्नागिरीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची हत्या

October 17, 2009 9:40 AM0 commentsViews:

17 ऑक्टोबर रत्नागिरीत राष्ट्रवादीच्या कार्यकत्याची हत्या करण्यत आली आहे. रवि मयेकर असं या कार्यकर्त्याचं नाव असून तो रत्नागिरीतल्या सोमेश्वर गावातला आहे. शुक्रवारी रात्री 11 वाजता मयेकर यांच्यावर काही लोकांनी धारदार हत्याराने हल्ला केला. त्यात गंभीर जखमी झालेल्या मयेकर यांचा मृत्यू झाल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापलेत. जोपर्यंत सर्व आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांंच्या भुमिकेमुळे रत्नागिरिच्या जिल्हा रुग्णालयात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. दरम्यान पोलीसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. रत्नागिरीच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच घडलेल्या या घटनेमुळे शहरातलं वातावरण तणापूर्ण झालयं. त्यामुळे पोलीसांना येत्या 22 तारखेला मतमोजणीच्या दिवशी आणखी चोख बंदोबस्त ठेवावा लागणार आहे.

close