जम्मू-काश्मिरचा क्रिकेटर परवेझच्या बॅगेत स्फोटक

October 17, 2009 11:39 AM0 commentsViews: 5

17 ऑक्टोबर जम्मू-काश्मिरचा क्रिकेटर परवेझ रसूलच्या बॅगमधून स्फोटकांचे अवशेष सापडल्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. परवेझ हा जम्मू-काश्मिरच्या 22 वर्षाखालील क्रिकेट टीमचा सदस्य आहे. सी के नायडू स्पर्धेसाठी जम्मू-काश्मिरची टीम सध्या बंगलोरमध्ये आहे. सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर पोलिसांनी मॅच सुरू करण्याला परवानगी देली आहे. पण यामुळे आता चॅम्पियन्स लीगची मॅच एक तास उशीराने सुरू होणार आहे. दरम्यान परवेझ रसूलला बंगळुरूमच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर अटक करण्यात आली असून टीमला हॉटेल बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे.

close