गोवा बॉम्बस्फोटाचे धागेदोरे मिरजेपर्यंत

October 19, 2009 9:18 AM0 commentsViews: 5

19 ऑक्टोबर गोव्या बॉम्बस्फोट प्रकरणी पोलिसांनी सनातन प्रभातच्या मिरजच्या कार्यालयावर छापा टाकला. तिथल्या 40 साधकांची गोवा पोलिसांनी चौकशी केली. या बॉम्बस्फोटात ठार झालेला तरुण मलगोंडा पाटील याचं काराजगी गाव सांगली जिल्ह्यात आहे. या गावात सध्या तणाव आहे. मलगोंडा पाटीलबद्दल गावकर्‍यांना फारशी माहिती नाही. पण त्याच्या कुटुंबीयांनी मात्र खरीखुरी माहिती दिली आहे. मलगोंडा 2 ते 3 वर्ष सनातन प्रभात या संस्थेत काम करत होता आणि गोव्यामध्ये राहत होता, हे त्यांनी मान्य केलं आहे. एकीकडे गोव्यातल्या स्फोटाचा तपास वेगात सुरू असताना आता महाराष्ट्र एटीएसनंही गोवा पोलिसांना सहकार्य करण्याचं ठरवलं आहे. गोवा पोलिसांच्या मदतीसाठी एटीएसनं समांतर तपास सुरू केला आहे. गोव्यामध्ये शुक्रवारी रात्री मडगाव स्टेशनजवळ स्कूटरच्या डिकीमध्ये स्फोट झाला होता. दरम्यान बॉम्स्फोटांसदर्भात नि:पक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी पण गोवा सरकार ती करेल की नाही याबद्दल मला शंका आहे, असं गोव्यातले विरोधी पक्षनेते मनोहर पर्रीकर यांनी म्हटलं आहे.

close