आश्रमशाळेच्या नावाखाली लहान मुलांचं लैंगिक शोषण

April 27, 2015 10:44 AM0 commentsViews:

molestation pimpri Girl
27 एप्रिल : कोल्हापूरमधील आश्रमशाळेतील मुलांना बेकायदेशीररित्या गोव्यामध्ये नेऊन त्यांचं लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मुलांना आश्रय देण्याच्या नावाखाली 9 ते 18 या वयोगटातील मुलांना गोव्यात नेण्यात आलं असून त्यांच्यावर अत्याचार झाल्याचं पोलिस चौकशीतून उघडकीस आलं आहे.

कोल्हापूरमधील कावळा नाका परिसरातील एका संस्थेतर्फे ‘मेरी वॉन्लेस’ या हॉस्पीटलच्या परिसरात आश्रमशाळा चालवली जायची. ‘आगापे’ असं या संस्थेचं नाव असून कोरियन नागरिक डेव्हीड किमो आणि कोल्हापूरमधील इम्युएल गायकवाड हे दोघेजणं ही संस्था चालवत होते.

या आश्रमशाळेत एकूण 20 मुलं आणि मुली होत्या. त्यापैकी 11 मुलांना गोव्यामध्ये नेण्यात आलं होते. गोव्यामध्ये एक ब्रिटीश नागरिक टीमोटी जेडेस याच्या ताब्यात ही मुलं देण्यात आली होती. जेडेसनेच या मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय गोवा पोलिसांनी व्यक्त केला आहे. गोव्यातील एका सामाजिक संस्थेच्या तक्रारीवरून गोवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या मुलांना सध्या गोव्यातील ‘अपना घर’ या संस्थेकडे देण्यात आलं आहे.

दरम्यान, कोल्हापूरमधला इम्युएल गायकवाड याच्याशी आयबीएन लोकमतनं संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यानं कोणतीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिलाय. तर दुसरीकडं कोल्हापूर पोलिसांचा एक पथकं गोव्याला रवाना झालं असून दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती कोल्हापूर पोलिसांनी दिली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close