सीताराम कुंटेंची बदली, अजोय मेहता मुंबईचे नवे महापालिका आयुक्त

April 27, 2015 1:32 PM0 commentsViews:

Ajoy mehta

27 एप्रिल : मुंबईच्या विकास आराखड्याच्या मुद्द्यावरून वादाच्या भोवऱयात सापडलेले मुंबई महापालिकेची आयुक्त सीताराम कुंटे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अजोय मेहता यांची महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अजोय मेहता सोमवारीच पालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

महापालिकेने तयार केलेल्या विकास आराखडय़ाला विविध राजकीय पक्षांसह बॉलीवूडमधील कलाकार आणि सर्वसामान्य नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. त्यामुळे राज्य सरकारने हा वादग्रस्त विकास आराखडा रद्द केला. तसेच, नवीन विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. हा आराखडा रद्द केल्याने महापालिका प्रशासन अडचणीत आले असताना महापालिका आयुक्त सिताराम कुंटे यांनी या आराखडय़ाचे समर्थन केले. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या बदलीचे आदेश दिले. दरम्यान, त्यांची बदली कोठे करण्यात आली याबाबतची अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. नवे आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे यापूर्वी पर्यावरण विभागाच्या सचिवपदाचा कार्यभार होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close