स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात जनसुराज्यच्या कार्यकर्त्यांची तोडफोड

October 19, 2009 9:23 AM0 commentsViews: 8

19 ऑक्टोबर जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अविनाश भोसेकर यांच्या कार्यकर्त्यांनी नांदेडमधल्या रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात तोडफोड केली आहे. कुलसचिव राम वाघ यांची गाडीही त्यांनी फोडली. विद्यापीठाचं गेस्ट हाऊस न मिळाल्याने त्यांनी ही तोडफोड केली. या हल्ल्यात कुलसचिव जखमी झालेत. याप्रकरणी पोलिसांनी भोसेकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. भोसेकर हे जनसुराज्य पक्षाचे उत्तर नांदेड या मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत उमेदवार आहेत.

close