बिहार आणि प.बंगालमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के

April 27, 2015 7:11 PM0 commentsViews:

bihar earthquake3327 एप्रिल : नेपाळमध्ये आलेल्या भीषण भूकंपाच्या सलग तिसर्‍या दिवशीही भारतात भूकंपाचे हादरे जाणवत आहे. आज बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसले आहे. बिहारमधील रांची, पूर्णिया, सहरसा,मधुबनी, असरिया, छपरा आणि पटनामध्ये भूकंपाचे धक्के जानवले. भूकंपाची तीव्रता 5.1 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपात कुठेही जीवतहानी झाल्याची माहिती नाही.

तर, नेपाळमध्ये भूकंपाला आता 48 तास उलटलेत. भूकंपामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता 3 हजार 726 वर गेलीय. तर 5 हजारांपेक्षा जास्त जण जखमी आहेत. पण सुदैवाने आज सकाळपासून हवामान सुधारलेलं आहे आणि पाऊस थांबलाय. त्यामुळे बचावकार्याला पुन्हा वेग येतोय. पण परिस्थिती अजूनही गंभीर आहे. भूकंपानंतर हजारो लोक तात्पुरत्या उभारण्यात आलेल्या मदत छावण्यांमध्ये राहतायत. या छावण्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधाही मिळत नसल्याची तक्रार होतेय. शिवाय काठमांडू सहित नेपाळच्या अनेक शहरांमधली मोबाईल सेवा अजूनही ठप्प आहे आणि अनेक भागांमध्ये विजेचा पुरवठाही सुरळीत झालेला नाही. भारतात भूकंपामुळे आतापर्यंत 69 जणांचा मृत्यू झालाय. तर 259 जण जखमी आहेत. यात बिहारमध्ये सर्वात जास्त म्हणजे 50 जणांचा बळी गेलाय. तर उत्तर प्रदेशात 14 जणांचा मृत्यू झाला. या भूकंपात बळी गेलेल्यांच्या नातेवाईकांना आता 6 लाखांची मदत देण्यात येणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close