ढिगाराखाली दबलेल्यांचा शोध पण…

April 27, 2015 7:31 PM0 commentsViews:

nepal_resku333327 एप्रिल : नेपाळमध्ये महाभूकंपानंतर जिकडे तिकडे कोसळलेल्या इमारतींचा ढिग साचलाय. ढिगार्‍यांखालून मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. नेपाळ भूकंपातल्या बळींचा आकडा आता 3,726 वर पोहोचलाय. आणखीही अनेक मृतदेह ढिगार्‍याखाली असण्याची शक्यता आहे.

मदतकार्य करणारे आता या ढिगार्‍याखाली कुणी जिवंता आहे का, याचा शोध घेत आहेत. पण उपकरणांच्या अभावी शोधकार्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. काठमांडूमधल्या या घरातले 12 जण सुखरूप बचावले पण या भूकंपाने 12 वर्षांच्या एका चिमरुडीचा बळी घेतलाय. नेहा चुमडा असं या चिमुरडीचं नाव आहे. अखेर दोन दिवसांनी या लहानगीचा मृतदेह ढिगार्‍याच्या बाहेर काढण्यात नेपाळी लष्कराला यश आलंय.

या भूकंपातून वाचलेले स्थानिक आता आपल्या बेपत्ता कुटुंबीयांचा शोध घेत आहेत. हे ढिगारे उपसल्यानंतर काहींना आपले कुटुंबीय जिवंत नाहीत, हे कळल्यानं मोठा धक्का बसलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close