बलात्कार झालेल्या मुलीचा मृत्यू

October 19, 2009 9:25 AM0 commentsViews: 1

19 ऑक्टोबर ठाण्यातल्या शहापूरमध्ये बलात्कारानंतर स्वतःला पेटवून घेतलेल्या मुलीचा मृत्यू झाला आहे. 15 वर्षांची ही मुलगी 85 टक्के भाजली होती. तिच्यावर ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. या मुलीला चाकूचा धाक दाखवून अपहरण करुन बलात्कार करण्यात आला होता. बदनामीच्या भीतीने तिच्या घरच्यांनी याची वाच्यता होऊ दिली नाही. मात्र मानसिक धक्का बसलेल्या या मुलीने घरी कोणीच नसताना स्वतःला पेटवून घेतलं. पोलिसांनी याप्रकरणी अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा नेंादवला असून, गुन्हेगार मात्र अद्यापही फरारी आहेत.

close