गोव्यातल्या स्फोटाशी संबंध नसल्याचा सनातनचा दावा

October 19, 2009 11:50 AM0 commentsViews: 2

19 ऑक्टोबर गोव्यात झालेल्या बॉम्बस्फोटांमागे सनातन संस्था असल्याच्या आरोपाचा सनातन संस्थेनं इन्कार केला आहे. एक दोन कार्यकर्त्यांमुळे संस्थेला बदनाम करणे योग्य नसल्याचही सनातनने म्हटलं आहे. सोमवारी पनवेलमध्ये सनातन संस्थेतर्फे एक पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये गोवा बॉम्बस्फोटांमागे सनातन संस्था नाही असा दावा करण्यात आला. गोव्याच्या गृहमंत्र्यांनी सनातनविषयी केलेलं वक्तव्यही बेजबाबदार असल्याची टीकाही यावेळी सनातनचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी केली आहे. तर मीडियानंच सनातन दोषी असल्याचा निष्कर्ष काढल्याचा आरोपही वर्तक यांनी केला. तसंच सनातनच्या एकाही कार्यकर्त्याला अटक करण्यात आलेली नाही असा दावाही वर्तक यांनी यावेळी केला. दरम्यान सनातन संस्था या हिंदुत्ववादी संघटनेवर बंदी घालण्याचा विचार गोवा सरकारनं करत आहे. गोव्याचे मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आयबीएन-नेटवर्कला ही माहिती दिली. शुक्रवारी रात्री मडगावमध्ये स्कूटरच्या डिक्कीत स्फोट झाला होता. त्यात 2 जण ठार झाले होते. याप्रकरणी एका मंत्र्याच्या पत्नीचीही चौकशी होत असल्याचं गोव्याचे गृहमंत्री रवी नाईक यांनी सांगितलं. संबंधित मंत्र्याची बायको सनातन संस्थेची कार्यकर्ती असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

close