गोवा बॉम्बस्फोट : दुसरा मृत्यू

October 20, 2009 9:28 AM0 commentsViews: 1

20 ऑक्टोबर गोवा बॉम्बस्फोटात जखमी झालेला आणखी एक आरोपी योगेश नाईक याचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री मडगावमध्ये स्कूटरच्या डिक्कीत स्फोट झाला होता. या स्फोटात मलगोंडा पाटील ठार झाला होता. तर योगेश नाईक जखमी झाला होता. त्याचा मंगळवारी मृत्यू झाला. हे दोघेही सनातन संस्थेचे कार्यकर्ते होते. मलगोंडा पाटील याचं काराजगी गाव सांगली जिल्ह्यात आहे. दरम्यान, या बॉम्बस्फोटप्रकरणी सोमवारी सनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवले यांची पोलिसांनी कसून चौकशी केली. आठवले यांच्याकडे संस्थेशी निगडित असलेल्या साधकांबाबत चौकशी करण्यात आली. आत्तापर्यंतच्या तपासात सनातन संस्थेच्या साधकांचा हात असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर गोवा पोलीस सनातन संस्थेशी संबंधित साधकांची चौकशी सुरू आहे. गोव्यासारख्या पर्यटन स्थळामध्ये अशी घटना घडल्यानं पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ नये, म्हणून या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे.

close