आयआयटीची कट ऑफ लिस्ट 80 टक्क्यांवर नेण्याचा विचार

October 20, 2009 9:32 AM0 commentsViews: 5

20 ऑक्टोबर आयआयटीच्या प्रवेश परीक्षेसाठी 12 वीच्या कट ऑफ लिस्टची मर्यादा वाढवण्याचा प्रस्ताव केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कपील सिब्बल यांनी अहवाल सादर केला आहे. पण त्याविरोधात अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या आयआयटीच्या प्रवेश परीक्षेसाठी बारावीत किमान 60 टक्के मार्क्सची अट आहे. पण मार्क्सचं बंधन 80 टक्क्यांपर्यंत वाढवलं जाईल, असं सिब्बल यांनी सोमवारी सांगितलं. कट ऑफ लिस्टची मर्यादा कमी असल्याने विद्यार्थी बारावीपेक्षा प्रवेश परीक्षेवर जास्त भर देतात. त्यामुळे कॉलेजातल्या अभ्यासापेक्षा प्रवेश परीक्षांच्या खासगी क्लासमध्येच विद्यार्थी गुंतून जातात. ही परिस्थिती बदलण्यासाठी कट ऑफ लिस्टची मर्यादा वाढवण्याचा विचार सुरू आहे. यासाठी एक समिती निर्माण करण्यात आली आहे. ही समिती आपला अहवाल तीन महिन्यांत सादर करेल. त्यानंतर कट ऑफ लिस्टची मर्यादा ठरवण्यात येईल. त्याची अंमलबजावणी 2011 पासून होईल.

close