हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हाला मिनरल वॉटर प्यावंस वाटणार नाही !

April 27, 2015 11:53 PM1 commentViews:

गोविंद वाकडे,पिंपरी-चिंचवड

27 एप्रिल : बाटलीबंद पाणी हे तुमची आमची सगळ्यांची गरज बनलीये. पण हे बाटलीबंद पाणी हे प्राणघातकदेखील ठरू शकतं. तहान भागवणार हे पाणी आरोग्याला अत्यंत घातक ठरू शकतं. बाटलीबंद काळ्या पाण्याच्या व्यवसायाचा आयबीएन-लोकमतनं पर्दाफाश केलाय.

pune water 345234सुजल ऍक्वा, माईक्रो ऍक्वा, ऍक्वा फ्रेश, इंद्रायणी प्युअर वाटर, द्वारका जल, समीक्षा ऍक्वा, सोम कुल जल आणि शोर्य प्युर कुल वॉटर…या आहेत मिनरल वॉटरच्या नावाखाली काळंपाणी विकणार्‍या कंपन्या. या कंपन्याचं पाणी तुम्हाला पुणे जिल्ह्यात सर्वत्र दिसेल. घरापासून ते आयटी कंपन्यापर्यंत…पण या बाटल्यांमध्ये कुठलं पाणी भरलं जातं…कसं पाणी भरलं जातं हे पाहिल्यावर तुम्ही कधीच हे पाणी विकत घेणार नाही.

हे आहे या बंद बाटल्यात पाण्या मागचं सत्य…गलिच्छ पाणी…कुठलही स्वच्छता नाही. आणि मिनरल वॉटरच्या नावाखाली ते तुमच्या-आमच्या माथी मारल्या जातं…बस स्टॉप पासून ते ऑफिसपर्यंत लोक तहान भागवण्यासाठी विश्वासानं हे पाणी विकत घेतात. पण त्यांना माहिती नसतं हे काळपाणी त्यांच्या जीवाववरही उठू शकतं. तहान भागवण्यासाठी लागणार हे पाणी प्राणघातकही ठरू शकतं. फक्त पैसे कमवण्यासाठी लोकांच्या आरोग्याशी जीवघेणा खेळ सुरू आहे. आयबीए-लोकमत या काळ्या धंद्याचा पर्दाफाश करतंय. आता बघायचंय प्रशासन कधी कारवाई करणार ते…

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • RAJ D

    could you please share video link of the full spacial report of this news…

close