राहुल गांधी लवकरच विदर्भ दौर्‍यावर ?

April 28, 2015 12:18 PM0 commentsViews:

rahul-gandhi-arrives-to-address-a-rally-at-shahid-minar-ground-131

28 एप्रिल : दोन महिन्यांच्या चिंतन सुटीवरून परतलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी दोन दिवसांच्या विदर्भ दौर्‍यावर येणार आहेत. राहुल गांधी येत्या 30 एप्रिल आणि 1 मे रोजी विदर्भाच्या दौर्‍यावर येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या भूसंपादन विधेयकावर आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन महिन्यांच्या सुटीनंतर मायदेशी परतलेल्या गांधी यांनी रामलीला मैदानावर किसान मजदूर रॅलीत भूसंपादनावरून मोदी सरकारवर तोफ डागली होती. त्यानंतर लोकसभेतही त्यांनी याच मुद्यावरून सरकारची कोंडी केली होती. अवकाळी आणि गारपीटीच्या तडाख्याने उद्धवस्त झालेल्या शेतकर्‍यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आश्वासन देणारे राहुल गांधी देशभरातील शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. त्यामुळे विदर्भ दौर्‍यात ते कोणती भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close