अंबानी बंधु गॅस वादाची सुनावणी सुरू

October 20, 2009 9:34 AM0 commentsViews: 5

20 ऑक्टोबर अनिल आणि मुकेश या अंबानी बंधूतल्या गॅसच्या वादावर मंगळवारपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू होणार आहे.मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड या कंपनीकडं या गॅसचे हक्क आहेत. कृष्णा-गोदावरी खोर्‍यातल्या गॅसची किंमत आणि वाट्यावरून अंबानी बंधूंमध्ये वाद सुरू आहे. या दोन बंधूंनी आपल्या खटल्याच्या सुनावणीसाठी दिग्गज वकिलांची नेमणूक केली. ज्येष्ठ वकील राम जेठमलानी अनिल अंबानी यांची तर हरीष साळवे, मुकेश अंबानी यांची बाजू मांडतील.

close