काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी लॉबिंग

October 20, 2009 9:36 AM0 commentsViews: 6

20 ऑक्टोबर राज्यात पुन्हा काँग्रेस आघाडीच सरकार येणार असं अनेक माध्याम आणि सर्वेमधून शक्यता वर्तवल्याने सरकार बनवण्यासाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठी जोरदार खलबतं सुरू आहेत. अशोक चव्हाणांबरोबरच सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, नारायण राणे, पृथ्विराज चव्हाण यांचीही नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहेत. या सर्व इच्छुकांनी आपापल्या परिनं लॉबिंग सुरू केलं आहे. काँग्रेस पक्षाचा मतदानाचा आढावा अहवाल प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी ए. के. ऍन्टोनी यांना दिल्लीत दिला. ते पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेटही घेणार असल्याचं कळतं. नारायण राणे आणि रोहिदास पाटीलही दिल्लीत दाखल झाले आहे. सरकार आपलंच येणार, असं समजून काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मोर्चेबंाधणी सुरू केली आहे. पण दुसरीकडे काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाची रेस लागली आहे. पण लाँबिंग करुन मुख्यमंत्रीपद मिळत नाही असं माणिकराव ठाकरेंनी म्हंटलं आहे. दरम्यान नारायण राणे यांचे निकटवर्तीय कन्हैयालाल गिडवाणी यांनी मंगळवारी ए.के अँटोनी याची भेट घेतली. गिडवाणी हे राणेंचे निकटवर्तीय समजले जातात.

close