मुख्यमंत्रीपद वाटून घ्यावं – छगन भुजबळ

October 20, 2009 10:35 AM0 commentsViews: 6

20 ऑक्टोबर मुख्यमंत्रीपद अडीच-अडीच वर्षं वाटून घेण्याचा राष्ट्रवादीचा काँग्रेसकडे आग्रह आहे. राष्ट्रवादीचाही मुख्यमंत्री बनू शकतो, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीलाही सांभाळता येईल. गेल्या वेळी राष्ट्रवादीकडे जास्त जागा असतानाही मुख्यमंत्रीपद काँग्रेसला दिलं होतं, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला आहे. दरम्यान आघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडेच राहिल, असं स्पष्टीकरण प्रफुल्ल पटेल यांनी दिलं आहे गेल्या दहा वर्षापासून काँग्रेस-राष्ट्रवादी मध्ये असलेलच सुत्र कायम राहणार आहे. मुख्यमंत्रिपदावरून वाद निर्माण करू पाहणार्‍या राष्ट्रवादीच्या नेत्यांना प्रफुल्ल पटेलांनी फटकारलं आहे.

close