अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या फरार आरोपीला अटक

October 20, 2009 10:43 AM0 commentsViews: 1

20 ऑक्टोबर ठाण्यातल्या शहापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या आरोपीला अटक करण्यात आली आहे. मधुकर बरोरा असं त्याचं नाव आहे. बलात्कारानंतर तो फरार होता. त्याने गुन्हा कबूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका 15 वर्षाच्या मुलीला चाकूचा धाक दाखवत बरोरा यानं तिचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला होता. बदनामीच्या भीतीने मुलीच्या घरच्यांनी याची चर्चा होऊ दिली नाही. मात्र मानसिक धक्का बसलेल्या या मुलीनं घरी कोणीच नसताना स्वतःला पेटवून घेतलं. ही मुलगी 85 टक्के भाजली होती. ठाण्याच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच तिचा सोमवारी मृत्यू झाला होता.

close