जोगेश्वरीत मनसेचा राडा, परप्रांतीय फेरीवाल्यांना केली मारहाण

April 29, 2015 11:23 AM0 commentsViews:

MNS JOGESHWARI RADA29  एप्रिल : मनसेने पुन्हा एकदा परप्रांतीयांचा मुद्दा उचलला आहे. जोगोश्वरीमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीय फेरीवाल्यांना मारहाण करत त्यांच्या हातगाड्यांची नासधूस केली. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.

मुंबईच्या जोगेश्वरी भागात काल (मंगळवारी) संध्याकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी 15 ते 20 परप्रांतीय फेरीवाल्यांना मारहाण केली तसंच त्याच्या हातगाड्यांवरच्या सामानांचीही नासधूस केली.

दरम्यान, हा सगळा प्रकार सुरू असताना पोलीसांनी फक्त बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप इथल्या फेरीवाल्यांनी केला आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close