खो-खो कोच गोपाळराव फडकेंच निधन

October 20, 2009 10:53 AM0 commentsViews: 7

20 ऑक्टोबरखो खोतले ज्येष्ठ नॅशनल कोच गोपाळराव फडके यांचं मंगळवारी पहाटे पुण्यात निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. ते स्वत: नॅशनल स्तरावर खो खो खेळले होते. त्यानंतरचं आपलं आयुष्य त्यांनी खो खोच्या प्रसारासाठी वेचलं. कोचिंग करताना त्यांच्या हाताखाली पंधरा छत्रपती पुरस्कारविजेते आणि चार अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू त्यांनी घडवले. 2000 साली केंद्र सरकारने द्रोणाचार्य पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. खो खो साठी द्रोणाचार्य पुरस्कार मिळालेले ते एकमेव खेळाडू होते. 2003 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं. तंत्रशुद्ध खो खो कसं खेळावं याच्या प्रशिक्षणासाठी त्यांनी एक ऑडिओ व्हिज्युअल फिल्म तयार केली होती. ही त्यांची फिल्मही बरीच गाजली. शेवटपर्यंत ते खो खोसाठी काम करत होते.

close