राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षपदी सुनिल तटकरे यांची फेरनिवड

April 29, 2015 1:01 PM0 commentsViews:

Image img_230422_suniltatkare_240x180.jpg29  एप्रिल : महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा सुनील तटकरे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी तटकरेंचं नाव सूचित केलं, तर धनंजय मुंडे यांनी सुनिल तटकरेंच्या नावाला अनुमोदन दिलं आहे. या पदासाठी दिलीप वळसे पाटील आणि राजेश टोपेंच्या नावाचीही चर्चा होती. पण अखेर पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्षपदी सुनिल तटकरे यांची फेरनिवड झाली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close