तब्बल 80 तासानंतर तरूणाची ढिगार्‍याखालून सुखरूप सुटका

April 29, 2015 1:50 PM0 commentsViews:

Rishi

29  एप्रिल :  नेपाळमधल्या भूकंपबळींचा आकडा 5 हजारांवर गेला असताना काठमांडूमध्ये सुरू असलेल्या बचावकार्याला नवीन आशा देणारी एक घटना घडली आहे. फ्रान्स आणि नेपाळच्या एका संयुक्त बचाव पथकाने 28 वर्षाच्या ऋषी खनाल नावाच्या तरुणाला तब्बल 80 तासांनंतर ढिगार्‍याखालून सुखरूप बाहेर काढलं.

फ्रान्सच्या एका बचाव पथकाने ऋषीला बाहेर काढलं. शनिवारी दुपारी काठमांडूत झालेल्या भूकंपात ऋषी ढिगार्‍याखाली गाढला गेला. फक्त इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने तब्बल 80 तास अन्नपाण्याशिवाय ढिगार्‍याखाली काढले. त्याला सुखरूप बाहेर काढण्यासाठी बचावकार्याला सहा तासाचा वेळ लागला. आता त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान ऋषीच्या पायाचं हाड मोडल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close