शिशिर शिंदे- नारायण राणे भेट

October 20, 2009 12:49 PM0 commentsViews: 6

20 ऑक्टोबर मनसेचे सरचिटणीस शिशिर शिंदे यांनी सोमवारी नारायण राणे यांची भेट घेतली. स्वानंद या नारायण राणे यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. या भ्ेाटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. काँग्रेसच्या गोटात सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. सरकार स्थापनेसाठी गरज लागल्यास कुणाची मदत घेता येईल याची चाचपणी सुरू झाली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्रीपदासाठीही जोरदार रस्सीखेच सुरू आहे. कोण किती आमदार काँग्रेसच्या दावणीला बांधणार यावर त्या नेत्याचा मुख्यमंत्रीपदावरचा दावा अधिक मजबूत होणार आहे. त्यामुळे शिंदे-राणे भेटीमुळे काँग्रेसच्या गोटात अस्वस्थता वाढली आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी शिशिर शिंदे नारायण राणेंना भेटल्याचं सांगण्यात येतं आहे.

close