मजाच मजा;आता शाळा 5 दिवसांचीच, शनिवारीही सुट्टी

April 29, 2015 8:31 PM2 commentsViews:

school off29 एप्रिल : सुट्टी म्हटल्यावर विद्यार्थ्यांसाठी जणू आनंदाची पर्वणाच पण आता विद्यार्थ्यांचा आनंद आणखी द्विगुणा होणार असून रविवारीअगोदर आता शनिवारीही शाळेला सुट्टी मिळणार आहे. राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांना आता पाच दिवसांचा आठवडा असणार आहे. आमदार कपिल पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या प्रयत्नाना यश मिळालंय.

मुंबईसह राज्यातल्या अनेक शहरांमध्ये प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये शनिवार, रविवारची सुट्टी असते. आणि पाच दिवसांचा आठवडा असतो. पण सहा दिवस शाळा चालली पाहिजे असा आग्रह शिक्षणाधिकारी धरत आहेत. त्यामुळे विद्यार्थी पालक आणि शिक्षकांमध्ये असंतोष होता. लोक भारतीचे अध्यक्ष, मुंबईचे शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी आज मंत्रालयात राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी शाळांना पाच दिवसांचा आठवडा करण्यास कोणतीही हरकत नसल्याचा स्पष्ट निर्वाळा दिला. मुंबईच्या शिक्षण उपसंचालकांना त्यांनी फोन करुन त्याबाबत तातडीने आदेशही दिले आहे. शाळेच्या आणि अभ्यासाच्या ताणातून मुलांची सुटका झाली पाहिजे आणि शनिवार, रविवार दोन दिवसांची सुट्टी मिळाली पाहिजे अशी मागणी करत कपिल पाटील यांनी यात आरटीईची कोणतीही अडचण येत नसल्याचे दाखवून दिले. शिक्षण सचिवांनी आरटीई आणि शासन निर्णय (29 एप्रिल 2011) यांची कोणतीही बाधा येत नसल्याने ‘पाच दिवस शाळा चालविण्यास आडकाठी न करता पाच दिवस शाळा चालविण्यास आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी’ असे लेखी आदेशच पाठवले आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Nagesh

    विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही असणारच…!

  • Ritesh ritesh

    Nirnay vidyarthyansathi swagathart. pan syllabus cover kasa karnar hyacha statistics kuni explain karel ka?

close