राज्यातील वाहतुकदारांचा संप मागे

April 30, 2015 12:10 PM0 commentsViews:

#chakkajam

30  एप्रिल : केंद्र सरकारच्या प्रस्तावित रस्ते वाहतूक सुरक्षा कायद्याविरोधात ‘नॅशनल फेडरेशन ऑफ ट्रान्सपोर्ट वर्कर्स’ने पुकारलेला बंद अखेर मागे घेतला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी नवीन कायदा राज्यात लागू करणार नाही असं आश्वासन दिल्यानंतर संघटनांनी संपातून माघार घेतली आहे. त्यामुळे राज्यभरातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

देशभरात आज वाहतूक संघटनांनी एक दिवसांचा संप पुकारला असून राज्यातही या संपाचे पडसाद दिसत होते. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात या संपाला अल्प प्रतिसाद मिळाला असला तरी राज्यातील ग्रामीण भागांमध्ये एसटी सेवा बंद असल्याने प्रवाशांचे हाल होत होते.

याप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज (गुरुवारी) सकाळी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी त्यांच्या निवासस्थानी राज्यभरातील वाहतूकदार संघटनांचे प्रमुख पदाधिकारी, बेस्ट आणि एसटीचे वरिष्ठ अधिकारी आणि अन्य संघटनांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीत रावतेंनी हा नवीन कायदा लागू करणार नसल्याचं तसंच एसटीचे खासगीकरण करणार नसल्याचं आश्वासनही दिलं आहे. रावतेंच्या आश्वासनानंतर राज्यभरातील वाहूतदार संघटनांनी संप मागे घेतल्याचे घोषणा केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close