राहुल गांधी नागपुरात पोहचले, उद्यापासून दौर्‍याला सुरूवात

April 29, 2015 11:12 PM0 commentsViews:

amethi_rahulgandhi29 एप्रिल : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आपल्या नियोजित दौर्‍यासाठी नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. राहुल गांधी उद्या गुरुवारी विदर्भाचा दौरा करणार आहेत. राहुल गांधींचा हा 175 किलोमीटरचा विदर्भ दौरा आहे. यावेळी राहुल गांधी 15 किलोमीटरची पदयात्रा करणार आहेत आणि आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबीयांची भेट घेणार आहेत.

भूसंपादन विधेयकाच्या विरोधात राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतलीये. राहुल यांनी पंजाब दौर्‍यानंतर आता महाराष्ट्राकडे मोर्चा वळवलाय. राहुल गांधी उद्या विदर्भाच्या दौर्‍याला सुरूवात करणार आहे. विदर्भात जवळपास 175 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. यामध्ये काही भागात ते पदयात्रा काढतील आणि काही भागांना गाडीने भेट देतील, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली. राहुल गांधी या दौर्‍यामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना भेट देतील.

अमरावतीत रस्ते चकाकले

अमरावतीपासून त्यांचा हा दौरा सुरू होतोय. त्यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यांचं काम सुद्धा सुरू झालंय. जिल्ह्यातल्या धामणगाव रेल्वे तालुक्यातल्या गुंजी, शहापूरपासून राहुल यांचा दौरा सुरू होतोय. त्यानंतर चांदूर रेल्वे तालुक्यातील टोंगलाबाद, रामगाव आणि रांजणा गावाचा दौरा करतील. राहुल गांधी यांचा एकूण दौरा 175 किमीचा असेल, त्यातील 15 किमी ते पदयात्रा करणार आहेत आणि उर्वरित दौरा कारने करणार असल्याची माहिती आहे. भूमी अधिग्रहण कायद्याच्या विरोधात राहुल गांधी यांनी मध्यप्रदेशमध्ये मोदींवर टीकास्त्र डागलं होतं. आता विदर्भाच्या दौर्‍यावर राहुल गांधी काय भूमिका घेतायत हे पाहाणं औत्सुक्याचं असेल. 59 दिवसांच्या विपश्यनेनंतर राहुल गांधी यांचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close