मुख्यमंत्री काँग्रेसचाच – शरद पवार

October 21, 2009 9:29 AM0 commentsViews: 5

21 ऑक्टोबर राज्यात आघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. तसचं राज्यात पुन्हा आघाडीची सत्ता येईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी सुरू केलेल्या मुख्यमंत्रिपदाबाबतच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेस महाराष्ट्रात जास्त जागा लढवत आहे, त्यामुळे त्यांचेच आमदार जास्त निवडून येणार आहेत, मुख्यमंत्रीही काँग्रेसचाच होणार असही ते म्हणाले मंगळवारी छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्रिपद वाटून घ्यावं अस वक्तव्य केलं होत. त्यावर शरद पवारांनी बुधवारी पुर्ण विराम दिला आहे.

close