मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात महिला पत्रकारांशी भेदभाव

April 30, 2015 1:06 PM0 commentsViews:

swaminarayan mandir30 एप्रिल : मुंबईतील स्वामी नारायण मंदिराच्या एका कार्यक्रमादरम्यान भेदभावाचा प्रकार उघड झाला. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातच महिला पत्रकारांशी भेदभाव झाल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई घडला आहे.

सरकारने गो वंश हत्या बंदीचा कायदा केल्याने, स्वामी नारायण मंदिरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सत्काराचा एका कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी पहिल्या तीन रांगा पत्रकारांसाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या जैन धर्माचे गुरू येणार म्हणून या रांगेत महिला पत्रकारांना बसता येणार नाही. स्वत: जैन धर्मगुरूंनीच हा आदेश दिला होता, असं आयोजकांकडून सांगण्यात आलं. या घटनेचा सर्वच सामाजिक थरांमधून तीव्र निषेध केला जातं आहे.

दरम्यान, स्वामी नारायण मंदिर ट्रस्टने मात्र, झाल्याप्रकाराबद्दल हात झटकलेत. हा कार्यक्रम जैन धर्मगुरूंचा असल्याने या प्रकाराशी आमचा काहीही संबंध नाही असं त्यांनी म्हटलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close