बाबा कदम यांचं निधन

October 21, 2009 9:33 AM0 commentsViews: 4

21 ऑक्टोबर जेष्ठ साहित्यिक बाबा कदम यांचं मंगळवारी रात्री निधन झालं. बुधवारी त्यांच्या पार्थिवावर कोल्हापुरात अंत्यसंस्कार करण्यात आले. पंचगंगा स्मशान भूमीत या जेष्ठ साहित्यिकाला अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी बाबांवर प्रेम करणार्‍या जेष्ठ साहित्यप्रेमींनी बाबानां श्रद्धांजली वाहिली. 1929 मध्ये जन्मलेल्या बाबांनी आपल्या कारकीर्दीत शंभरच्यावर कादंबर्‍यांसह अनेक लघूकथा लिहिल्या. या त्यांच्या लिखाणावर अनेक चित्रपटही निघाले.

close