मुलाच्या लग्नासाठी ‘डॅडी’ला पॅरोल मंजूर

April 30, 2015 4:59 PM0 commentsViews:

arun gavli30 एप्रिल :  गँगस्टर अरुण गवळीला अखेर रजा मंजूर झालीये. गवळीला 15 दिवसाच्या पॅरोल मिळाला आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने गवळीला हा पॅरोल मंजूर केला आहे. त्यामुळे डॅडी आता आपल्या मुलाच्या लग्नाला उपस्थित राहणार आहे.

अरूण गवळीने त्यांच्या मुलाचं लग्न असल्याने 15 दिवसांचा पॅरोल मिळावा असा अर्ज सुरुवातीला विभागीय आयुक्तांकडे केला होता. हा अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर गवळीने नागपूर खंडपीठात अर्ज केला होता. त्यावर गुरुवारी पॅरोल मंजूर करण्यात आला. गवळीला दोन प्रकरणात शिक्षा झाली आहे. जन्मठेपेची शिक्षा आहे. शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या खून प्रकरणात तसंच दादर येथील एका व्यापार्‍यांकडे खंडणी मागितल्या प्रकरणात गवळी यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणाचे खटले मुंबई सेशन कोर्टातील विशेष मोक्का कोर्टात चालले. यावेळी कोर्टाने गवळीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गवळी ही शिक्षा नागपूर जेलमध्ये भोगत आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close