पोलीस स्मृतिदिना निमित्त शहिदांना मानवंदना

October 21, 2009 9:34 AM0 commentsViews: 18

21 ऑक्टोबर 21 ऑक्टोबर हा दिवस देशभरात पोलीस स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. मंुबईतही बुधवारी नायगाव इथे हुतात्मा दिन मानवंदना संचलन या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहिली. 21 ऑक्टोबर 1959 यादिवशी हॉट स्प्रिंग्ज या सीमावर्ती भागात गस्त घालत असताना चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात 10 पोलीस शिपाई शहीद झाले होते. त्या पोलीस शिपायांना मानवंदना म्हणून आणि याचबरोबर आपलं कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलिसांना देशभरात मानवंदना दिली जाते.

close