पेट्रोल 4 तर डिझेल 2.37 रुपयांनी महागले

April 30, 2015 10:46 PM0 commentsViews:

Petrol30 एप्रिल : महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्य जनतेच्या खिशाला आता आणखी कात्री बसणार आहे. पेट्रोलच्या दरात 3.96 तर डिझेलच्या दरात 2.37 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

दोन महिन्यांपूर्वी आंतराष्ट्रीय बाजारात क्रुड तेलाच्या किंमतीत कपात होत होती. त्यामुळे याचे परिणाम भारतातही जाणवले. भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कमालीची कपात करण्यात आली होती. मात्र, आता ही कपात भरून काढली जात आहे. फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पेट्रोलच्या दरात 3 रुपये 18 पैशांने वाढ करण्यात आली होती. तर डिझेलच्या दरातही 3 रुपये 9 महागले होते. एप्रिलमहिन्याच्या सुरुवातील पेट्रोल 49 तर डिझेल 1 रुपयांने स्वस्त करून जनतेला दिलासा देण्यात आला. पण, हा दिलासा महिन्याच्या अखेरीस हिरावून घेण्यात आला. पेट्रोलच्या दरात 3 रुपये 96 तर डिझेलच्या दरात 2 रुपये 37 पैशांने महागले आहे. त्यामुळे याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close