हेरगिरी करण्यार्‍या शास्त्रज्ञाला अटक

October 21, 2009 9:39 AM0 commentsViews: 5

21 ऑक्टोबर भारताच्या चांद्रयान मिशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या एका अमेरिकेच्या शास्त्रज्ञाला FBI ने इस्त्राइलसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपावरून अटक केली आहे. इस्त्रोने सुरक्षेच्या बाबतीत आपण कोणतीच तडजोड केलेली नाही असं म्हटलं आहे. अटकेत असलेले स्टिवॉर्ट डेविड नोजेट हे चंद्रावरील पाण्याचे पुरावे शोधण्यासाठी मदत करणार्‍या दलामध्ये कार्यरत होते. नुकतेच चंद्रावर झालेल्या उत्खनन कार्यक्रमासंबंधित दलाचे ते नेतृत्व करत होते. त्यांच्याविरोधात गोपनीय माहिती उघड केल्याप्रकरणी, माहिती दुसर्‍याला पाठवल्याप्रकरणी तसेच माहितीचा प्रसार केल्याप्रकरणी दाखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

close