दुचाकी-रिक्षाची धडक सीसीटीव्हीत कैद

April 30, 2015 9:20 PM1 commentViews:

30 एप्रिल : वसईतील पापडी नायगाव इथं आज (गुरुवारी) सकाळी रिक्षा आणि मोटरसायकलचा अपघात झाला. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. पापडी रोडवरच्या राऊत हॉस्पिटलसमोरचा हा अपघात झाला. वेगानं येणारे बाईकस्वार टर्न होणार्‍या ऑटोरिक्षाला धडकले आणि बाजुच्या नाल्यात फेकले गेले. सकाळी 6 च्या सुमारास हा अपघात झाला. फिरायला निघालेल्या एका महिलेनं मदतीसाठी लोकांना थांबवलं आणि दोनही तरूणांना बाहेर काढलं. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. एका तरूणाला साधं खरचटलं असून दुसर्‍या तरूणाच्या छातीला मार लागलाय. त्याच्यावर वसईतल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Prasad Gavas

    Rikshawala is worst drivers… i also had my accident coz of rick… no traffic sense

close