‘#महाराष्ट्रदिन’निमित्त मुख्यमंत्र्यांनी वाहिली हुतात्म्यांना आदरांजली

May 1, 2015 8:36 AM0 commentsViews:

CM in asfasfhutamna

1 मे : आज 1 मे महाराष्ट्र दिन. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचा आज 55 वा वर्धापन दिन. या निमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान संयुक्त महाराष्ट्र लढ्यासाठी प्राण वेचणार्‍या हुतात्म्यांच्या मुंबईतल्या हुतात्मा स्मारकावर सकाळी मुख्यमंत्र्यांनी पुष्पचक्र वाहिलं. राज्याच्या विकासासाठी आपण बांधील असल्याची ग्वाही देत, त्यासाठी झटण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये 106 आंदोलक हुतात्मे झाले. या आंदोलनापुढे नमतं घेऊन संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. 1 मे 1960 रोजी तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. पंडित नेहरुंनी यशवंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगलकलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली. तेव्हापासून दरवर्षी 1 मे हा महाराष्ट्र दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभर वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. 1965 साली मुंबईत हुतात्मा स्मारक उभारण्यात आलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close