शूर-वीर, संत आणि विचारवंताच्या महाराष्ट्राला शुभेच्छा- नरेंद्र मोदी

May 1, 2015 11:07 AM0 commentsViews:

modi

1 मे : महाराष्ट्र ही संत, विचारवंत आणि शूरवीरांची भूमी असून देशाच्या विकासात महाराष्ट्राने नेहमीच मोलाचे योगदान दिले असे नमूद करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे मोदींनी ट्विटरवर मराठीतून महाराष्ट्रातील तमाम जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभरात आज दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरद्वारे महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रवासासाठी शुभेच्छा असे मोदींनी म्हटले आहे. या ट्विटमध्ये मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटोही पोस्ट केले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सकाळी मुंबईतील हुतात्मा चौक येथील स्मारकाला भेट दिली. यावेळी त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी युती सरकार कटीबद्ध आहे अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close