हुतात्मा चौकात मनसेचं शक्तीप्रदर्शन

May 1, 2015 3:06 PM0 commentsViews:

mns in hutatma c01 मे : महाराष्ट्र दिनानिमित्ताने मुंबईच्या हुतात्मा चौकात मनसेने जोरदार राजकीय शक्तीप्रदर्शन केलं. मुंबईतून मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते बाईक रॅली काढत हुतात्मा चौकात पोहचले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हुतात्मा चौकात शहिदांना आदरांजली वाहिली. यावेळी इतर राजकीय पक्षाचे नेतेसुद्धा आदरांजली वाहण्यासाठी आले होते. पण मनसेने आज हुतात्मा चौकात जोरदार शक्तीप्रदर्शन करत आदरांजली वाहण्याचा कार्यक्रमच हायजॅक केल्याचं दिसून आलं.

दरम्यान, बाबासाहेब पुरंदरे यांना इतक्या उशिरा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिल्याबद्दल राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close