महाराष्ट्रदिनी वेगळ्या विदर्भाचा नारा

May 1, 2015 5:15 PM0 commentsViews:

vidharbha andolan301 मे: राज्यभरात महाराष्ट्रदिन साजरा केला जात आहे मात्र, विदर्भात वेगळ्या विदर्भासाठी नारेबाजी करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत भाजपने स्वतंत्र विदर्भाचं आश्वासन दिलं होतं पण वर्ष होतं आलं तरी हे आश्वासन न पाळल्याबद्दल विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने महाराष्ट्र दिनी आंदोलन करण्यात आलं.

नागपूरच्या व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ निदर्शनं करण्यात आली. विदर्भवाद्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रतिकात्मक पुतळे दहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन आंदोलकांचा प्रयत्न हाणून पाडला. सिताबर्डी पोलिसांनी 25 कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांची रवानगी पोलीस ठाण्यात केली. भाजपने आपले आश्वासन पाळावे आणि विदर्भाला पुन्हा राज्याचा दर्जा द्यावा ही मागणी करण्यात आली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close