‘त्या’ औषधाचा मुलं होण्याशी काहीही संबंध नाही -बाबा रामदेव

May 1, 2015 5:32 PM0 commentsViews:

babaramdev63001 मे : योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली संस्थेच्या ‘पुत्रजीवक बीज’ औषधाचा विरोध करणार्‍या विरोधकांवर बाबा रामदेव यांनी तोफ डागलीय. पुत्रजीवक औषधाचा मोदी यांच्याशी काहीही एक संबंध नाहीये. त्यामुळे ना मोदी मुलं हवी आणि नाही मला असा पलटवार रामदेव यांनी केला. तसंच टीकाकारांनी संसदेत नीट अभ्यास करून जावं असा खोचक टोलाही रामदेव यांनी लगावला.

बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीकडून विकण्यात येत असलेल्या ‘पुत्रजीवक’ या औषधीवरून सध्या वाद पेटलाय. हे औषध वंध्यत्वनिवारण करणारं आणि मुलगा देणारं असल्याचा दावा पतंजलीनं केलाय. यावरून विरोधकांनी बाबा रामदेव यांच्याविरोधात गुरुवारी राज्यसभेत रान पेटवलंय. पण, हे नाव आयुर्वेदातच दिलेलं आहे. त्याचा वंधत्वाशी संबंध नाही. पण जर यावर असाच वाद होत असेल तर औषधीवर मुलं होण्याशी याचा काही संबंध नाही असं लिहावं लागेल असं स्पष्टीकरण बाबा रामदेव यांनी दिलंय. आपल्यावर आरोप करणारे समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन आणि जेडीयूचे नेते के. सी. त्यागी यांनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केलीय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close