वाळू चोरीप्रकरणी सेनेचे आमदार वैभव नाईकांविरोधात गुन्हा दाखल

May 1, 2015 8:58 PM0 commentsViews:

malvan vaibhav naik01 मे : शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यावर त्यांच्याच मतदारसंघात वाळू चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. सिंधुदुर्गात वाळू उत्खननास बंदी असतानाही सील केलेल्या होड्यांचे सील तोडून कायदेभंग आंदोलन करणारे  वैभव नाईक आणि त्यांच्या 25 कार्यकर्त्यांवर मालवण पोलिसांत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

मालवण मधील वायंगणी गावात वैभव नाईक आणि त्यांच्या साथीदारांनी बुधवारी आंदोलन छेडलं होतं. मागील आठवड्यात सिंधुदुर्ग प्रशासनाने बेकायदेशीर वाळू उत्खनन करणार्‍या होड्यांवर कारवाई करत या होड्या आणि डंपर सील केले होते.याला उत्तर म्हणून सत्ताधारी असलेल्या नाईक यांनीच हे कायदेभंगाच आंदोलन छेडत वाळू उत्खनन सुरू केलं. वैभव नाईक यांच्यासह संजय पडते आणि अन्य 25 जणांवर वाळू चोरणे, सरकारी कामकाजात अडथळा आणणे, जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा अवमान करणे तसंच पर्यावरण रक्षण कायद्याचा भंग करणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close