भारताला मायदेशात हरवणं कठीण – रिकी पाँटिंग

October 21, 2009 12:11 PM0 commentsViews: 3

21 ऑक्टोबर भारताला घरच्या मैदानावर हरवणं सोपं नसल्याचं आस्ट्रेलियाचा कॅप्टन रिकी पाँटिंगने म्हटलं आहे. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा आत्मविश्‍वास नक्कीच दुणावला असल्याचंही त्याने पत्रकारांशी बोलताना सांगितलं. पुढच्या आठवड्यापासून सुरू होणार्‍या भारत-ऑस्ट्रेलिया वन-डे सीरिजसाठी ऑस्ट्रेलियाची टीम भारतात दाखल झाली. आस्ट्रेलियाचा कॅप्टन रिकी पाँटिंगने मुंबईत पत्रकार परिषद घेतली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या वन-डे सीरिजसाठी भारतीय टीमही सज्ज झाली आहे. टीम इंडियाचा मुंबईत जोरदार सराव सुरू आहे. कॅप्टन महेंद्रसिंग धोणी, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग आणि हरभजन सिंग या अनुभवी खेळाडूंनी सरावाला आपली हजेरी लावली. नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत बॉलिंग आणि फिल्डिंग या दोन्ही क्षेत्रात भारतीय खेळाडंूची कामगिरी सुमार झाली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन-डे सीरिजमध्ये भारतीय खेळाडूंना आपली कामगिरी सुधारण्यावर भर द्यावा लागणार आहे.

close