‘त्या’ मुलीचा मृत्यू देवाची इच्छा’, पंजाबच्या मंत्र्यांची मुक्ताफळं

May 2, 2015 3:57 PM0 commentsViews:

surjeet_singh_rakhra02 मे : मोगा विनयभंग प्रकरणी पंजाबचे शिक्षण मंत्री सुरजीत सिंग राखरा यांनी मृत मुलीच्या कुटुंबियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलं. सुरजीत सिंग राखरा यांनी मुलीचा मृत्यू देवाची इच्छा होती असं खळबळजनक वक्तव्य केलंय.

पंजाबमधल्या मोगामध्ये 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला धावत्या बसमधून फेकून देण्यात आलं होतं. या मुलीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार न करण्यावर तिच्या घरचे ठाम आहेत. पंजाब सरकारने देऊ केलेली 20 लाखांची मदत आणि नोकरीही त्यांनी नाकारलीय. ज्या बसमध्ये हा प्रकार घडला त्या बस कंपनीचा परवाना रद्द करावा अशी मागणी या मुलीच्या कुटुंबाने केलीय. ही बस कंपनी पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचा मुला सुखबीर सिंग बादल याची आहे. तर या मुलीच्या कुटुंबियांच्या जखमेवर पंजाबचे कॅबिनेट मंत्री आणि अकाली दलाचे मंत्री सुरजीत सिंग राखरा यांनी मीठ चोळलंय. या मुलीचा मृत्यू ही देवाची मर्जी होती असं विधान या मंत्र्यांनी केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. बस कंपनी वर कारवाई करण्यात आलेली नाही याच्या निषेधार्थ मोगामध्ये निदर्शनं करण्यात आलीये. या मुलीला न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं संतप्त स्थानिकांनी म्हटलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close