राज्यात काँग्रेस आघाडीची सेंच्युरी

October 22, 2009 4:47 AM0 commentsViews: 8

22 ऑक्टोबर राज्यात युतीला मागे टाकत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने सेंच्युरी ठोकली आहे, आतापर्यंत आलेल्या मतमोजणी मध्ये राज्यात आघाडीकडे कल दिसतो. सरकार बनवण्यासाठी हॅटट्रिकची संधी त्यांना आली आहे. पहिलीच विधानसभा लढवणार्‍या मनसेचं इंजिन वेगात धावत आहे, 10 च्या जागांवर त्यांनी मुसंडी मारली आहे. त्याचबरोबर बंडखोरांचही वर्चस्व कायम आहे. अनेक ठिकाणी बंडखोर उमेदवार आघआडीवर आहेत. मंत्रीपदं दिली तर तिसरी आघाडी काँग्रेस आघाडीला पाठिंबा देण्याची तयारी रामदास आठवलेंनी दाखवली आहे.सकाळी दहा वाजेपर्यंत आघीडीवर असलेले पक्षीय बलाबल (मतमोजणी चालू )काँग्रेस 73 , राष्ट्रवादी 59, शिवसेना 51, भाजप 45, मनसे 10 अपक्ष 30 तिसरी आघाडी 12

close