चेंबूरमध्ये केरोसिनची पाईपलाईन फुटली

May 2, 2015 8:44 PM0 commentsViews:

kerosin02 मे : चेंबूरमध्ये भारत पेट्रोलियमच्या केरोसिनची पाईपलाईन फुटलीये. त्यानंतर गडकरी खान परिसरात सगळीकडे केरोसिनचा वास येऊ लागलाय.

बीपीसीएल कंपनीचे कर्मचारी घटनेच्या ठिकाणी आलेत आणि पाईपलाईन दुरुस्तीचं काम सुरू केलंय. सुदैवानं कोणतीही दुर्घटना टळलीय.

या दुरुस्तीसाठी किमान सहा तास लागणार आहेत. पण ही पाईपलाईन नेमकी कशी फुटली हे सांगायला मात्र बीपीसीएलच्या कर्मचार्‍यांनी नकार दिलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close