एलबीटीविरोधात आंदोलन करणार्‍यांवरचे गुन्हे मागे घेणार-मुख्यमंत्री

May 2, 2015 9:29 PM0 commentsViews:

cm on lbt news2may02 मे : राज्य सरकारने एलबीटी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय आणि आता एलबीटीविरोधात आंदोलन करणार्‍या व्यापार्‍यांना फडणवीस सरकारने दिलासा दिलाय. एलबीटीविरोधात आंदोलन करणार्‍यांवरचे गुन्हे मागे घेण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीये.

आघाडी सरकारच्या काळात लागू झालेल्या एलबीटी अर्थात स्थानिक कर प्रणालीला व्यापार्‌र्‍यांनी कडाडून विरोध केला होता. निवडणुकीच्या काळात भाजपने एलबीटी रद्द करण्याचं आश्वासन दिलं होतं. अखेर या आश्वासनाची पूर्तता करत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी फडणवीस अर्थसंकल्पात एलबीटी रद्द करण्याची घोषणा केली होती. येत्या 1 ऑगस्ट 2015 पासून एलबीटी कर रद्द करण्यात येणार आहे. आज विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने आयोजित केलेल्या सत्कार कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी व्यापार्‍यांना दिलासा दिलाय. 1 ऑगस्ट 2015 पासून आम्ही एलबीटी परत घेत आहोत. विदर्भात मोठ्या प्रमाणात उद्योग येत आहेत. दावोस आणि हॅनोव्हर दौर्‍यात मिळालेला प्रतिसाद पाहता राज्यात आणि विदर्भातही चांगली गुंतवणूक होईल.अमरावतीत वस्त्रोद्योग सुरू होत आहे. एकूणच परिस्थिती विदर्भाला भक्कम आर्थिक पाठबळ देईल त्यामुळे एलबीटीविरोधात आंदोलन करणार्‍यांवरचे गुन्हे मागे घेणार असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close