हरयाणातही काँग्रेसची बाजी : बंडखोरांची मदत घेण्याची चिन्हं

October 22, 2009 3:03 PM0 commentsViews: 2

22 ऑक्टोबर हरीयाणात काँग्रेसने सर्वात जास्त 40 जागा मिळवत सिंगल लार्जेस्ट पार्टी होण्याचा मान मिळवला असला, तरी सत्ता स्थापनेसाठी अपक्ष आणि बंडखोरांची मदत घ्यावी लागणार अशी चिन्हं आहेत. पण विरोधी पक्षनेते आणि इंडियन नॅशनल लोक दलाचे सर्वेसर्वा ओमप्रकाश चौतालांनीही सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्यात. त्यामुळे जागांची मेजॉरीटी मिळूनही काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा मार्ग सुकर नसेल, असं दिसतंय. चौतालांच्या लोकदल पक्षाने 32 जागांवर विजय मिळवलाय. त्यामुळे त्यांना सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असणार्‍या 45 जागांचा जादूई आकडा गाठायचा असेल, तर जुना मित्रपक्ष भाजप आणि भजनलाल यांच्या जनहित काँग्रेसचा आधार घ्यावा लागणार आहे. भाजपला 4 तर, जनहित काँग्रेसला 7 जागा मिळाल्यात. दरम्यान, 45 चा जादूई आकडा गाठण्यासाठी काँग्रेसने बंडखोरांशी संपर्क सुरू केलाय. त्यामुळे येते काही दिवस हरीयाणात सत्ता स्थापनेसाठीच्या जागांची जुळवाजुळव सुरू राहिल, अशी चिन्हं आहेत.

close