फ्लायओव्हर नसल्याने नागरिक संतापले, विनोद तावडेंवर बरसले

May 3, 2015 8:40 PM0 commentsViews:

03 मे : मढआयलंड ते वर्सोवा या फ्लायओव्हरची मागणी पूर्ण होत नसल्याने संतापलेल्या नागरिकांच्या रोषाचा फटका रविवारी मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे यांना बसला. प्रवासी बोटीच्या उद्घाटनासाठी आलेल्या विनोद तावडे आणि खासदार गोपाळ शेट्टी यांच्या बोटीच्या दिशेने ग्रामस्थांनी कुंड्या व हार फेकत आपला रोष व्यक्त केला.

मढआयलंड – वर्सोवाला जोडण्यासाठी फ्लायओव्हर बांधावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र अद्याप ही मागणी पूर्ण झालेली नाही. रविवारी वर्सोवा ते मढ आयलंड या प्रवासी बोटीचा उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमासाठी विनोद तावडे व गोपाळ शेट्टी मढआयलंडला आले होते. सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षाला कंटाळून संतप्त ग्रामस्थांनी तावडे व शेट्टी ज्या बोटीच्या उद्घाटनासाठी आले होते त्या बोटीच्या दिशेने कुंड्या व हार भिरकावले. यामुळे परिसरातील वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close