राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठीची मोहोर

May 3, 2015 8:09 PM0 commentsViews:

×Öêê×ÖêêßÖî×ãßæ²Ö

03 मे : 62 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी बाजी मारली असून मराठी चित्रपटांनी एकूण 7 पुरस्कारांवर नाव कोरले आहे. रविवारी संध्याकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. मराठी चित्रपट ‘कोर्ट’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सुवर्ण कमळाने गौरविण्यात आले.

रविवारी दिल्लीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली, राज्यमंत्री राज्यवर्धनसिंह राठोड आदी नेते या सोहळ्याला उपस्थित होते. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मान करण्यात आला. चित्रपटसृष्टीत दिलेल्या बहुमोल योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शशी कपूर या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत आणि त्यांच्या निवासस्थानीच हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मराठी चित्रपट विभागात किल्ला या चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपट म्हणून गौरवण्यात आला. तर लघुपटात दिग्दर्शक रवी जाधवचा ‘मित्रा’ या लघुपटासाठी गौरव करण्यात आला.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे मानकरी

 • सर्वोत्कृष्ट चित्रपट : चैतन्य ताम्हणे (कोर्ट)
 • सर्वोत्कृष्ट लघुपट : रवी जाधव (मित्र)
 • सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट : किल्ला
 • विशेष उल्लेखनिय चित्रपट : किल्ला
 • सर्वोत्कृष्ट बालचित्रपट : एलिझाबेथ एकादशी
 • सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट : क्वीन
 • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : कंगणा राणावत
 • विशेष उल्लेखनिय पुरस्कार : भूतनाथ रिटर्न्स
 • सर्वोत्कृष्ट संगीत : विशाल भारद्वाज (हैदर)
 • लोकप्रिय चित्रपट : मेरी कोम
 • सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी : बिस्मिल (हैदर)
 • पार्श्वगायक पुरस्कार : सुखविंदर सिंग (हैदर)
 • स्पेशल ज्युरी पुरस्कार : ख्वाडा

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close