पुणे-सातारा मार्गावर वाहतूक कोंडी

May 4, 2015 11:57 AM0 commentsViews:

pune traffic

04 मे : पुण्याहून सातार्‍याला निघालेल्या कंटेनर पलटी झाल्यामुळे या मार्गावरील वाहतूक आज (सोमवारी) सकाळी तात्पुरती बंद करण्यात आली. पुण्याहून सातार्‍याकडे जाणारी वाहतूक खंबाटकी घाटाजवळील बोगद्यातून वळवण्यात आली आहे. पण, सलग चार दिवसांच्या सुटीनंतर अनेक लोक सातारामार्गे पुण्याकडे येत असल्याने या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे.

सातार्‍याकडून पुण्याकडे येणारी वाहने खंबाटकी बोगद्याचा वापर करतात. याच बोगद्यातून पुण्याहून सातार्‍याकडे जाणारी वाहतूकही वळवण्यात आल्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. घाटात पलटी झालेला कंटेनर क्रेनच्या मदतीने बाजूला काढण्या आला असून वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close