कृपाशंकर सिंह यांच्या विरोधात गुन्हा दाखल

May 4, 2015 1:33 PM0 commentsViews:

Krupashankar

04 मे : काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी सिंह यांच्यासह पाच कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक शाखेने ही कारवाई केली आहे.

विशेष म्हणजे बेहिशेबी मालमत्ता प्रकरणातून स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी कृपाशंकर सिंह आर्थिक नुकसान झाल्याचं दाखवत आहेत. शेअर बाजारात गुंतवलेल्या पैशात नुकसान, अनेक बिल्डर, नेते, फिल्मस्टार यांना दिलेली मोठी कर्जे बुडल्याने त्यातूनही त्यांचं नुकसान झाल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close